India Corona Update : देशात 2.11 लाख सक्रिय रूग्ण, गेल्या 24 तासांत 15,158 रूग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 15 हजार 158 नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1 कोटी 5 लाख 42 हजार 841 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 2 लाख 11 हजार 33 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णापैकी 1 कोटी 01 लाख 79 हजार 715 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत 16 हजार 977 बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.55 टक्के एवढं झाले आहे.

देशात आजवर 1 लाख 52 हजार 093 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 175 रूग्णांचा मृत्यू झाला असून देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे. देशात आजवर 18 कोटी 57 लाख 65 हजार 491 नमूने तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.15) त्यापैकी 8 लाख 08 हजार 090 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला आजपासून (शनिवारी) सुरूवात झाली. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. आज आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना 2 हजार 934 केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात 100 जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.