India Corona Update: देशात 2 कोटी चाचण्या पूर्ण, बाधितांची संख्या 18 लाखांच्या पुढे

India Corona Update: 2 crore tests completed in the country, the number of victims exceeds 18 lakh मागील 24 तासांत देशात 771 मृत्यूंची  नोंद झाली असून आजवर देशात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 38,135 इतकी झाली आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाच्या चाचण्यांनी 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशभरात 52,972 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार सद्य घडीला देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 18 लाख 03 हजार 696 वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण 18 लाख 03 हजार 696 पैकी सध्या देशात एकुण 5,79,357 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून आजवर 1,186,203 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मागील 24 तासांत देशात 771 मृत्यूंची  नोंद झाली असून आजवर देशात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 38,135 इतकी झाली आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या चाचण्यांनी 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात एकूण 2,02,02,858 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून यातील 3,81,027 चाचण्या या मागील 24 तासात पार पडल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीची आणि मृतांची सरासरी 96.84 : 3.16 टक्के आहे. देशात सध्या महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) तर्फे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड -19 च्या लसीची फेज 2 आणि 3 मधील मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्रॅजेन बरोबर भागीदारी केली आहे. ‘कोशविल्ड’ असं या लसीला नावं देण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.