India Corona Update: गेल्या 24 तासांत 24,879 नवे रुग्ण, 487 जणांचा मृत्यू: एकूण रुग्ण संख्या 7.67 लाखांवर

India Corona Update: 24,879 new patients, 487 deaths in last 24 hours: Total number of patients rises to 7.67 lakh मागील 24 तासांत झालेल्या 487 मृतांच्या संख्येबरोबर देशातील मृतांची संख्या 21,129 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 24,879 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 487 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,67,296 वर जाऊन पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 7,67,296 एकूण रुग्ण संख्येपैकी 2,69,789 सक्रिय रुग्ण आहेत तर 4,76,378 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत झालेल्या 487 मृतांच्या संख्येबरोबर देशातील मृतांची संख्या 21,129 एवढी झाली आहे.

पाच सर्वाधिक रुग्ण असलेली राज्ये (कंसात मृत्यू)

महाराष्ट्र – 2,23,724 ( 9,448)

तमिळनाडू – 1,22,350 (1,700)

दिल्ली – 1,04,864 (1,313)

गुजरात – 38,333 (1,993)

मध्यप्रदेश – 31,156 (845)

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून गेल्या 24 तासांत 19,547 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत 1,07,40,832 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत पैकी 2,67,061 एवढ्या चाचण्या 8 जुलै रोजी करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.