India Corona Update: कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत सर्वाधिक 26,506 नवे रूग्ण; बाधितांची संख्या 8 लाखांच्या उंबरठ्यावर

India Corona Update: 26,506 new corona patients in the last 24 hours; The number of victims is on the threshold of 8 lakhs दिलासादायक बाब म्हणजे, आजवर 4,95,513 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 475 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले.

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 26,506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर जाऊन पोहोचला आहे.

देशात पहिल्यांदाच एका दिवसाच्या रूग्ण संख्येने 26 हजारांचा टप्पा पार केला असून ही आजवरची सर्वांत मोठी वाढ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी सध्या 2,76,685 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे, आजवर 4,95,513 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 475 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 21,604 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी 1.8 लाख, सोमवारी 2.41 लाख, तर मंगळवारी 2.62 लाख तर बुधवारी 2.67 लाख जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

गुरूवारी (दि.9) 2,83,659 चाचण्या करण्यात आल्या असून देशात आजवर 1,10,24,491 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. वाढत्या टेस्टमुळे अधिक रुग्ण सापडत असल्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.