_MPC_DIR_MPU_III

India Corona Update : गेल्या 24 तासांत 29,091 जण कोरोनामुक्त तर, 16,375 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात मागील काही दिवसापासून नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 29 हजार 091 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, 16 हजार 375 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 56 हजार 845 एवढी झाली आहे. त्यापैकी 99 लाख 75 हजार 958 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आजघडीला देशात 2 लाख 31 हजार 036 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या 24 तासांत 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 49 हजार 850 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.32 टक्के एवढं आहे. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 65 लाख 31 हजार 997 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 8 लाख 56 हजार 236 नमूने सोमवारी (दि.4) तपासण्यात आले आहेत.

औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरु होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी बोलत होते.

भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1