India Corona Update : देशात ‌29,181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 0.40 टक्के

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 528 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 3 हजार 997 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्याच्या घडीला 29 हजार 181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होऊन 0.40 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 30 लाख 04 हजार 005 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रूग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.73 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 149 आजवर 5 लाख 16 हजार 281 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 78.18 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 6.33 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 180.97 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.