India Corona Update : गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 38,887 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 30 हजार 549 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 38 हजार 887 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 08 लाख 96 हजार 354 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 17 लाख 26 हजार 507 एवढी झाली आहे. देशात सध्या 4 लाख 4 हजार 958 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

https://twitter.com/ANI/status/1422409206217404418?s=19

भारतात आजवर 4 लाख 25 हजार 195 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 422 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.36 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 47 कोटी 12 लाख 94 हजार 789 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 49 हजार 295 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

https://twitter.com/ICMRDELHI/status/1422403692188225537?s=19

 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 47 कोटी 85 लाख 44 हजार 114 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 61 लाख 09 हजार 587 जणांना लस टोचण्यात आली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.