India Corona Update : मागील चोवीस तासांत 34 हजार 477 जणांना डिस्चार्ज; देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.11 टक्के

एमपीसी न्यूज – देशातील संसर्गाचा वेग मंदावला असला तरी अजूनही दररोज 20 ते 30 हजाराच्या दरम्यान रूग्णसंख्या वाढत आहे. मागील चोवीस तासांत तब्बल 34 हजार 477 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.11 टक्के एवढे झाले आहे.

देशात मागील 24 तासांत 22 हजार 065 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 99 लाखांचा टप्पा ओलंडला आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 99 लाख 06 हजार 165 एवढी झाली आहे. त्यापैकी 94 लाख 22 हजार 636 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या निरंतर कमी होत चालली आहे. सध्या देशात 3 लाख 39 हजार 820 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 354 रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 1 लाख 43 हतार 709 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे.

देशात आजवर तब्बल 15 कोटी 55 लाख 60 हजार 665 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 93 हजार 665 नमूने सोमवारी (दि. 14) तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

मागील काही दिवसांपासून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे, देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील साडे तीन लाखांच्या खाली आली आहे. दरम्यान, सीरमचे आदर पुनावाला यांनी जानेवारी पासून देशात कोरोना लसीकरण सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.