India Corona Update : 24 तासात 36, 604 नवे रुग्ण, गेल्या तीन महिन्यांतील सर्वात निच्चांकी रुग्णवाढ

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देशात मागील तीन महिन्यांतील सर्वात कमी रुग्ण वाढ नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासात देशात 36 हजार 604 नवे रुग्ण आढळले आले आहेत.

सोमवारी देशात कोरोनामुळे 490 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत भारतात 1 लाख 19 हजार 496 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 79 लाख 46 हजार 652 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्ण वाढत्या संख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या 6 लाख 30 हजार 546 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 72 लाख 1 हजार 70 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतली घट सलग गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 90 टक्क्यांवर‌ पोहचलं आहे. सध्या केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जग कोरोनामुळे हैराण झालेलं असताना शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचं संशोधन केलं आहे. या संशोधनामधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सध्या फ्लूचा प्रभाव काहीसा कमी होत आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्विलांस डेटामधून ही माहिती समोर आली आहे की, फ्लूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा 98 टक्के घट झाली आहे.

उदाहरणच द्यायचं झालं तर, 2020 च्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 14 फ्लूच्या केसेस समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी हीच संख्या 367 होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार एन्फ्लूएंजा व्हायरस म्हणजे फ्लू हा साधा वाटणारा रोग आहे. पण या रोगामुळे दर वर्षाला जगभरात 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.