India Corona Update: गेल्या 24 तासांत 380 रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत्यू संख्या दहा हजारांजवळ

India Corona Update: 380 patients die in last 24 hours, total death toll close to ten thousand केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 3,43,091 झाला आहे. त्यापैकी 1,53,178 सक्रिय रुग्ण आहेत

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 380 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूची संख्या 9,900 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सलग दोन दिवस अकरा हजार रुग्णांची नोंद झाल्यानतर आज अकरा हजारापेक्षा कमी म्हणजे 10,667 रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 3,43,091 झाला आहे. त्यापैकी 1,53,178 सक्रिय रुग्ण आहेत आणि जवळपास 1,80,013 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

देशातील सर्वाधिक फटका बसलेली पाच राज्य (कंसात मृत्यू)
महाराष्ट्र – 1,10,744 (4,128)
तामिळनाडू – 46,504 (479)
दिल्ली – 42,829 (1,400)
गुजरात – 24,055 (1,505)
उत्तर प्रदेश – 13,615 (399)

नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रभाव दिसेल अशी शक्यता वर्तवणारा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (ICMR) फेटाळला आहे. या अहवालातील निष्कर्ष दिशाभूल करणारे आहेत. हा अहवाल आयसीएमआरने बनवलेला नाही. त्यासाठी निधीही पुरवलेला नाही, असा दावा करण्यात आला.

कोरोनासंदर्भातील राष्ट्रीय कृती गटाचे सदस्य अहवाल तयार करण्यात सहभागी झाले होते. त्यापैकी, अरविंद पांडे यांनी हा अहवाल मागे घेण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रांशी चर्चा करून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आजवर घेतलेली हि सातवी व्हिडिओ कॉन्फरन्स असणार आहे.

पंतप्रधान प्रत्येक राज्यातील वैद्यकीय सुविधांची उपलब्धता तसेच देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी कशापद्धतीने अनलॉकमध्ये आणखी सूट देता येईल या बद्दल सविस्तर चर्चा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.