India Corona Update : गेल्या 24 तासांत 4.42 लाख चाचण्या तर 48,661 नवे रुग्ण

India Corona Update: 4.42 lakh tests and 48,661 new patients in last 24 hours

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासात कोरोनाचे 48 हजार 661 नवे रुग्ण आणि 705 मृत्यू नोंदवले गेले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 वर पोहचली आहे. यापैकी 4 लाख 67 हजार 882 सक्रिय रुग्ण आहेत तर, 8 लाख 85 हजार 577 जणांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात 32 हजार 063 जणांचा आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II
देशात आजवर कोरोना व्हायरसाठी 1 कोटी 62 लाख 91 हजार 331 चाचण्या घेण्यात आल्या आहेत यापैकी 4 लाख 42 हजार 263 चाचण्या शनिवारी (दि.25) करण्यात आल्या आहेत, यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिली आहे. गेल्या 30 दिवसात सगळ्यात जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असली तरी देशातील रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9 टक्के झाला आहे. कर्नाटक राज्यांत आता दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त सक्रिय रुग्ण आहेत. याबाबत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 1 लाख 45 हजार 785 सक्रीय रुग्ण आहेत. तर कर्नाटकात 55 हजार 396 आहेत. 52 हजार 273 रुग्णांसह तमिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.