India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 46,791 नवे रुग्ण, 587 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत चालला असून, दररोज वाढ होणा-या रुग्णांची संख्या घसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 46 हजार 791 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय रूग्णसंख्या दरामध्ये सातत्याने घट होत असून, हा दर 8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मागील 24 तासांत झालेल्या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 75 लाख 97 हजार 064 एवढी झाली आहे. त्यापैकी 67 लाख 33 हजार 329 एवढे रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 7 लाख 48 हजार 538 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या दर कमी होण्यास मदत होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे.

मागील 24 तासांत देशभरात 587 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 15 हजार 197 रुग्ण दगावले आहेत. रुग्णांची तपासणी करून वेळेवर आणि प्रभावी औषधोपचार सुरू केले जात आहेत. ज्या लोकांना अगदी किरकोळ स्वरूपात कोरोनाची बाधा झाली असेल त्यांना घरामध्येच विलग ठेवून औषधोपचार केले जात आहेत तसेच सक्रिय रूग्ण गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला रूग्णालयात वेळेवर दाखल करून योग्य ते उपचार केले जात असल्यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.

नव्याने कोरोना बरे झालेल्या रूग्णांमध्ये 79 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यातल्या रूग्णांचा समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रातून एका दिवसात 15 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.