India Corona Update : चोवीस तासांत 47,262 नवे रुग्ण, 1.17 कोटी एकूण रुग्ण संख्या

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 47 हजार 262 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 17 लाख 34 हजार 058 एवढी झाली आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत पाच कोटी नागरिकांनी लस घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 12 लाख 05 हजार 160 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 23 हजार 907 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.49 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 64 लाख 38 हजार 861 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 25 हजार 628 चाचण्या मंगळवारी (दि. 23) रोजी करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 3 लाख 68 हजार 457 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 275 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 60 हजार 441 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा आहे‌.

पाच लाख नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 5 कोटी 08 लाख 41 हजार 286 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. एक एप्रिल पासून देशात 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे. 45 सर्वांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन सरकारने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.