India Corona Update : देशात गेल्या 24 तासात आढळले 49881 नवे पॉझिटिव्ह, 517 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज :    देशात 24 तासांत कोरोनाचे 49 हजार 881 नवीन रुग्ण आढळले आणि तर 517 जणांचा मृत्यू झाला. नवीन केसेस आल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 80 लाख 40 हजार 203 वर पोहचली आहे. आतापर्यंत 1 लाख 20 हजार 527 रुग्ण संक्रमणामुळे मरण पावले आहेत. आतापर्यंत 73 लाख 15 हजार 989 लोक बरे झाले आहेत. 6 लाख 3 हजार 687 सक्रिय प्रकरणे आहेत.  

देशातील पाच राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण केंद्र सरकारला तणाव देत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली या पाच राज्यांतील बुधवारी नव्याने समोर आलेल्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे 50 टक्के प्रकरणे आहेत.

केंद्राने असे म्हटले आहे की ज्या राज्यांमध्ये प्रकरणे वाढत आहेत त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले गेले आहे. त्या 5 राज्यांव्यतिरिक्त, अशी आणखी 5 राज्ये आहेत जिथे सक्रीय प्रकरणे देशात सर्वाधिक आहेत. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

 

– बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 6378 नवे रुग्ण आढळले, 8430 लोक बरे झाले आणि 91 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 16 लाख 60 हजार 406 लोकांना हा संसर्ग झाला आहे. यापैकी 1 लाख 29 हजार 401 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 14 लाख 86 हजार 926 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 43 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

– बुधवारी दिल्लीत कोरोना प्रकरणातील सर्व नोंदी मोडीत निघाल्या. गेल्या 24 तासांत, 5673 नवीन प्रकरणे समोर आली. त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या वाढून 3,70,014 झाली. यासह, राजधानीतील सकारात्मकता दर देखील 9.37% पर्यंत वाढला आहे. येथे रिकव्हरी दर 90.33% आहे, तर सक्रिय रुग्णांचा दर 7.93% आणि मृत्यू दर 1.73% आहे.

– बिहारमध्ये बुधवारी 780 लोकांना कोरोनाची लागण झाली. 1073 लोक बरे झाले आणि 4 रुग्णांचा मृत्यू. आतापर्यंत 2 लाख 14 हजार 163 लोकांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 2 लाख 4 हजार 317 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत संक्रमणामुळे 1069 लोकांचा मृत्यू झाला आहे.

– उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी 1980 नवीन रुग्ण आढळले, 2742 लोक बरे झाले आणि 18 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 34 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यापैकी 25 हजार 487 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 4 लाख 43 हजार 589 लोक बरे झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत राज्यात 6958 लोकांचा बळी घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.