India Corona Update: देशभरात 64,533 नवे रुग्ण तर 1,007 मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या 24.61 लाखांवर

India Corona Update: 64,533 new patients and 1,007 deaths across the country; The number of corona victims is 24.61 lakh महाराष्ट्रात गुरुवारी पहिल्यांदाच सर्वांत जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा आहे.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपासून देशात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 64 हजार 533 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जवळपास 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारी (दि.13) दिवसभरात आजवरच्या सर्वाधिक 8 लाख 48 हजार 728 नमुने तपासण्यात आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 लाख 61 हजार 191 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

देशात आतापर्यंत 17 लाख 51 हजार 556 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 6 लाख 61 हजार 595 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 48 हजार 040 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.14) 8 लाख 48 हजार 728 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या आजवर केलेल्या सर्वाधिक चाचण्या आहेत. देशात 14 ऑगस्टपर्यंत तब्बल 2 कोटी 76 लाख 94 हजार 416 कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

देशात दररोज रुग्ण संख्या वाढण्याबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 56 हजार 383 रुग्ण बरे झाले. हे प्रमाण 70.76 टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे 17 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी 1.96 टक्क्यांवर आला आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी पहिल्यांदाच सर्वांत जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात काल 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत.

त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे. राज्यात काल 9 हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.