India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 74,442 नवे कोरोना रुग्ण, 903 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत देशभरात 74,442 नवे कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 23 हजार 816 एवढी झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 55 लाख 86 हजार 704 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 9 लाख 34 हजार 427 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 903 रुग्ण दगावले आहेत आत्तापर्यंत 1 लाख 02 हजार 685 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात आत्तापर्यंत 7 कोटी 99 लाख 82 हजार 394 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 89 हजार 860 चाचण्या या रविवारी (दि. 4) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारकडे 400 ते 500 कोटी डोस उपलब्ध होतील. त्यातील 25 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी संडे संवाद या कार्यक्रमात बोलताना वर्तवला आहे.

सरकार कोरोनावरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी 24 तास काम करतं आहे, कोरोनाची लस आल्यानंतर वितरण प्रणालीचंही काम सुरु आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे. कोरोना लशीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समिती कार्यरत असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.