India Corona Update : चोवीस तासांत देशात 7,579 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 7 हजार 579 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 3 हजार 698 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 1 लाख 13 हजार 584 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 536 दिवासांतील ही नीचांकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 26 हजार 480 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 46 हजार 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

देशात गेल्या 24 तासांत 236 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 66 हजार 147 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.34 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 9.64 लाख नमुने तपासले आहेत. 

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 117 कोटी 63 लाख 73 हजार 499 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 71 लाख 92 हजार 154 जणांना लस टोचण्यात आली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.