India Corona Update : गेल्या 24 तासांत 82,203 रुग्णांना डिस्चार्ज, 72,049 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 82 हजार 203 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर देशात 72 हजार 049 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 67 लाख 57 हजार 132 एवढी झाली आहे. त्यापैकी 57 लाख 44 हजार 694 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या 9 लाख 07 हजार 883 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात मागील 24 तासांत 986 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 04 हजार 555 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.01 टक्यांवर पोहोचले आहे तर मृत्यूदर 1.54 टक्के एवढा झाला आहे.

देशात मंगळवारी (दि.6) 11 लाख 99 हजार 857 नमूने तपासण्यात आले. आतापर्यंत देशभरात 8 कोटी 22 लाख 71 हजार 654 नमूने तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या घटतानाच बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी जवळपास 12 हजार नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात 17 हजार रुग्ण करोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांचे प्रमाण 80.48 टक्क्यांवर गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.