India Corona Update : गेल्या 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त, 78,524 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 83,011 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील रिकव्हरी रेट वाढताना पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 एवढी झाली आहे. त्यापैकी 58 लाख 27 हजार 705 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या 9 लाख 02 हजार 425 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात मागील 24 तासांत 971 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 05 हजार 526 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशात बुधवारी (दि.7) 11 लाख 94 हजार 321 नमूने तपासण्यात आले. आतापर्यंत देशभरात 8 कोटी 34 लाख 65 हजार 975 नमूने तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिसा, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.