India Corona Update : 24 तासांत 83,347 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 56 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – देशात अद्यापही कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 56 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासांत देशात 83 हजार 347 नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, 1 हजार 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 लाख 46 हजार 11 वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण 56 लाख 46 हजार 11 कोरोनाबाधितांमध्ये 9 लाख 68 हजार 377 सक्रिय रुग्ण आहेत तर, 45 लाख 87 हजार 617 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 90 हजार 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मंगळवार (22 सप्टेंबरपर्यंत) देशभरात 6 कोटी 62 लाख 79 हजार 462 नमून्यांची तपासणी झाली तर, 9 लाख 53 हजार 683 नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 81.25 टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदर 1.60 टक्के एवढा झाला आहे.

जगातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा भारतात जास्त आहे. देशातील 60 टक्के रुग्ण हे देशातील पाच राज्यात आहेत त्यातही निवडक जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.