India Corona Update : चोवीस तासांत 96,982 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 446 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 96 हजार 982 नव्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 446 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाने वेग घेतला आहे. सोमवारी (दि.05) तब्बल 43 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 049 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 17 लाख 32 हजार 279 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 50 हजार 143 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92.48 टक्के एवढा झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची 7 लाख 88 हजार 223 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 446 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 65 हजार 547 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.30 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 25 कोटी 02 लाख 31 हजार 269 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 12 लाख 11 हजार 612 चाचण्या सोमवारी (दि.05) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

सोमवारी 43 लाख नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
देशात लसीकरण कार्यक्रमाने वेग घेतला आहे. सोमवारी (दि. 05) तब्बल 43 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 8 कोटी 31 लाख 10 हजार 926 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.