India Corona Update : 98 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.92 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून, मागील 24 तासांत 24 हजार 900 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.92 टक्क्यांवर पोहोचले आहे.

मागील 24 तासांत देशभरात 16,432 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 02 लाख 24 हजार 303 एवढी झाली आहे. त्यापैकी 98 लाख 07 हजार 569 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजघडीला देशात 2 लाख 68 हजार 581 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 98 लाख 01 हजार 749 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 86 हजार 695 नमूने सोमवारी (दि.28) तपासण्यात आले आहेत.

देशभरात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 153 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मागील 24 तासांत 252 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.92 टक्के एवढं आहे.

देशात मागील तीन दिवसांपासून 20 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. मोठ्या प्रमाणावर होणा-या रुग्ण वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असून तो सध्या 96 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.