India Corona Update: विक्रमी वाढ! 24 तासांत तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू

India Corona Update: 9,887 Coronavirus Cases In India In 24 Hours, Biggest One-Day Jump

एमपीसी न्यूज- प्रशासकीय स्तरावर योग्य ती काळजी घेतली जात असतानाही देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 9887 नवीन प्रकरणे समोर आली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. बरे होणाऱ्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात शुक्रवारच्या तुलनेत थोडीशी घट झाली आहे. ही टक्केवारी 48.27 टक्क्यांवरुन 48.20 टक्क्यांवर आली आहे.

मागील 24 तासांत 294 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूबरोबरच कोरोनामुळे देशातील मृतांचा आकडा 6642 इतका झाला आहे. देशात सध्या 2.3 लाख कोरोना बाधित रुग्ण आहे. जागतिक यादीत भारताने इटलीला मागे टाकून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे देशात आतापर्यंत 1.14 लाख रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.


दरम्यान, महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 139 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा 2849 झाला आहे.

सध्या राज्यात 46 शासकीय आणि 37 खासगी अशा एकूण 83 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण 3827 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2832 इतके आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.