-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update : कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत ‘उच्चांकी’ 24,850 कोरोनाबाधितांची वाढ, 613 रुग्णांचा मृत्यू 

An increase of 24,850 corona positive cases, 613 deaths in the last 24hrs धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देशात 24 तासांमध्ये 24,850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  613 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. 

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6,73,165 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4,09,083 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे,  भारतात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा दर  60 टक्क्यांवर आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी, 2, 48, 934 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. देशात आतापर्यंत 97,89,066 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात मागच्या 24 तासांत राज्यात 7,074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 2,00,064 वर गेली आहे. शनिवारी 295 जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील देशी लस विकसित होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या मानवी लसीच्या चाचणीला 29  जून रोजी परवानगी देण्यात आली होती.  देशातील बारा वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. मात्र, इतक्या वेगाने लस निर्माण करण्यासंदर्भात भारतातील तज्ज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.