India Corona Update : दिलासादायक ! देशात 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील 24 तासांत नव्याने वाढ झालेल्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 56 हजार 082 नव्या बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 29 हजार 942 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 29 लाख 92 हजार 517 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 56 हजार 082 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 37 लाख 15 हजार 221 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 876 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 49 हजार 992 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 82.38 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 30 कोटी 56 लाख 187 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 50 हजार 110 चाचण्या सोमवारी (दि.10) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 17 कोटी 27 लाख 10 हजार 066 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.