India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या 42 लाखांच्या पुढे, 90 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मागील 24 तासांत देशभरात 1,016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 71 हजार 642 रुग्ण दगावले आहेत.

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांची विक्रमी वाढ होत आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या क्रमवारीत भारत ब्राझील देशाला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर गेला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 90 हजारांहून अधिक, 90 हजार 802 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 016 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 42 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात दोन दिवसांत 1.81 लाख नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (दि.7) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 42 लाख 04 हजार 614 एवढी झाली आहे. त्यापैकी 32 लाख 50 हजार 429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 8 लाख 82 हजार 542 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 1,016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 71 हजार 642 रुग्ण दगावले आहेत.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार 507 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 20 हजार 362 नमुन्यांची तपासणी ही रविवारी (दि.6) करण्यात आली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 69 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 77.31 टक्के एवढा झाला आहे तर मृत्यूदर 1.7 टक्के आहे. देशात सध्या 20.99 टक्के सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत भारताने ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर उसळी घेतली आहे. अमेरिकेत 64 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून तो देश पहिल्या क्रमांकावर आहे तर ब्राझीलमध्ये 41.37 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.