India Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 51 लाखांच्या पुढे, 97 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मागील 24 तासांत देशभरात 1,132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – डॉक्टर, नर्स, शास्त्रज्ञ यांच्या अथक प्रयत्नांनतरही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच पाहायला मिळत आहे. मागील 24 तासातील आकडेवारी लक्षात घेता  देशात 97 हजारांहून अधिक, 97 हजार 894 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने आता 51 लाखांच्या पुढचा टप्पा गाठला आहे.

देशातील एकूण 51 लाख 18 हजार 254 रुग्णांमध्ये 10 लाख 09 हजार 976 इतके सक्रीय रुग्ण तर 40 लाख 25 हजार 080 रुग्ण उपचारानंतर बरे झालेले आणि स्थलांतरीत आणि 83 हजार 198 इतक्या मृतांच्या नोंदीचा समावेश आहे.

 

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशात 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 36 हजार 613 नमुन्यांची तपासणी ही बुधवारी (दि.16) करण्यात आली आहे.

सध्या देशात वाढत असलेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे 97.97% : 2.03%  इतके असून रिकव्हरी रेट 78.64% इतका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.