India Corona Update : कोरोनाची गेल्या 24 तासांत दिलासादायक आकडेवारी समोर 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यापासून गेल्या 24 तासांत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशभरात मागील 24 तासांत 12 हजार 584 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 79 हजार 179 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 01 लाख 11 हजार 294 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी 18 हजार 385 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सध्या देशात 2 लाख 16 हजार 558 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 167 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 51 हजार 327 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.48 टक्के एवढा आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 26 लाख 52 हजार 887 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 97 हजार 056 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.11) करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि.11) कोरोना लशीकरणासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 16 जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन ‘मेड इन इंडिया’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोकांना लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील आणि 50 वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल. येत्या काही महिन्यांमध्ये 30 कोटी लोकांना लस देण्याचं ध्येय असल्याचे मोदी म्हणाले. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.