India Corona Update : कोरोना रुग्णवाढ थांबेना, चोवीस तासांत वाढले 1,61,736 रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णवाढ काही केल्या थांबेना. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 61 हजार 736 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 कोटी 22 लाख 53 हजार 697 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 97 हजार 168 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 89.86 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 879 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 71 हजार 058 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.25 टक्के एवढा आहे‌. देशात आजवर 25 कोटी 92 लाख 07 हजार 108 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 122 चाचण्या सोमवारी (दि.12) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 10 कोटी 85 लाख 33 हजार 085 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.