India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या 13.36 लाखांवर, मृतांची संख्या 31हजारांच्या पुढे

India Corona Update: Corona toll rises to 13.36 lakh, death toll rises to 31,000 मागील 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 31,358 वर जाऊन पोहचली आहे. 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात  48,916 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13,36,861 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी 4,56,071 सक्रिय रुग्ण आहेत तर 8,49,432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आहेत. मागील 24 तासांत देशभरातून 32,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 31,358 वर जाऊन पोहचली आहे.

आयसीएमआर ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर तब्बल 1,58,49,068 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 4,20,898 नमूण्यांची चाचणी शुक्रवारी (दि.24) करण्यात आलेल्या आहेत.

देशात गेल्या 48 तासांमध्ये सुमारे एक लाख रुग्णांची भर पडली असून, तीन आठवडय़ांमध्ये देशातील रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे.  जगभरात कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या क्रमवारीत फ्रान्सला मागे टाकून भारत सहाव्या स्थानी आला आहे. असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी 2.38 टक्के आहे. 10 लाख लोकसंख्येमागे 864 लोकांना करोनाची बाधा झाली असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण 63.44 एवढं झालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.