India Corona Update : देशाचा रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर; 24 तासांत 12,464 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 464 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 07 लाख 98 हजार 921 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, देशाचा रिकव्हरी रेट 97.07 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 12 हजार 286 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 24 हजार 527 एवढी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 68 हजार 358 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

‘आयसीएआर’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 21 कोटी 76 लाख 18 हजार 057 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 59 हजार 283 नमुन्यांची तपासणी सोमवारी (दि.1) करण्यात आली.

गेल्या 24 तासांत देशात 91 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 248 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 48 लाख 54 हजार 136 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

देशात काल (1 मार्चपासून) कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील कोमॉरबिड नागरिकांना लस दिली जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.