Coronavirus India Update: देशात 24 तासांत 6566 नवे रुग्ण, बरे होणाऱ्यांचे प्रमाण 42.75 टक्के

india corona update cross 158000 positive cases in last 24 hours increases 6566 active cases recovery rate 42 75 percent

एमपीसी न्यूज- जगभरासह भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,58,333 झाली आहे. तर यामुळे 4,351 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 6,566 नवीन प्रकरणे तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, यातही दिलासादायक गोष्ट म्हणजे 67,692 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 42.75 टक्क्यांवर पोहोचले आहे.

राजधानी दिल्लीतही कहर

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणू बाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मागील 24 तासांत दिल्लीत कोरोना बाधितांच्या संख्येने सर्वांत मोठी उसळी घेतली. 24 तासांत दिल्लीत 792 नवीन प्रकरणे समोर आली.

त्याचबरोबर कोरोना बाधितांचा आकडा 15,257 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील 24 तासांत 310 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 7264 जण यातून बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

राज्यात बुधवारी (दि.27) कोरोनाच्या 2190 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी 964 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार 918 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 56 हजार 948 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.