India Corona Update : 40 हजार बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज, 82.90 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 791 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील आतापर्यंत 82 लाख 90 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असून, तो सध्या 93.42 टक्के एवढा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 29 हजार 164 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 88 लाख 74 हजार 291 एवढी झाली आहे. त्यापैकी 82 लाख 74 हजार 291 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या 4 लाख 53 हजार 401 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 449 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 30 हजार 519 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.47 टक्के एवढा आहे. आयसीएआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 12 कोटी 65 लाख 42 हजार 907 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 44 हजार 382 नमूणे सोमवारी (दि.16) तपासण्यात आले आहेत.

भारतातील कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी आपल्या लशीची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत सहा कोटी डोस सिरम इन्स्टिट्यूटने तयार केले आहेत, तर भारत बायोटेकनेही आपल्या लशींचे उत्पादन सुरू केले आहे. देशातील कोरोना विषाणूचा बिमोड करण्यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत लशीचे सहा कोटी डोस तयार केले आहेत.

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरमकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तब्बल 1600 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.