India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून कमी रुग्ण, 111 दिवसांतील निच्चांक

एमपीसी न्यूज – देशात सलग दुसऱ्या दिवशी चाळीस हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 703 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, मागील 111 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 06 लाख 19 हजार 932 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 97 लाख 52 हजार 294 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 51 हजार 864 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतात आजवर 4 लाख 03 हजार 281 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने रिकव्हरी रेट वाढून 97.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 42 कोटी 14 लाख 24 हजार 881 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 47 हजार 424 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 35 कोटी 75 लाख 53 हजार 612 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 45 लाख 82 हजार 246 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.