India Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक रुग्ण, 380 जणांचा मृत्यू

India Corona Update: For the second day in a row, more than 19,000 patients, 380 died देशात सलग पाचव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, 1 जूनपासून 3,38,324 रुग्णांची भर पडली आहे.

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 19,459 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून रविवारी 19,906 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. मागील 24 तासांत 19,459 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 380 जणांचा मृत्यू झाला आहे.

याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 5,48,318 वर पोहोचली आहे. पैकी 2,10,120 सक्रिय रुग्ण आहेत तर 3,21,723 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सलग पाचव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, 1 जूनपासून 3,38,324 रुग्णांची भर पडली आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक 1,64,626 रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 86,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 70,607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 7,429 जणांचा मृत्यू झाला आहे.

लोक घरीच चाचणी करू शकतील यासाठी दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. एक महिन्यात हा संच तयार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हैदराबादमध्ये वाढती रुग्ण संख्या पाहून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यासंबंधी निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येणार असल्याची माहिती तेलंगणा राज्याने दिली आहे.

आसाम मधील गुवाहाटीमध्ये सुद्धा दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.