India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी देशात 60 हजारांहून अधिक रुग्ण तर 933 जणांचा मृत्यू

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 88 हजार 612 इतकी झाली आहे.

एमपीसी न्यूज – सलग दुसऱ्या दिवशी देशात 60 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 61 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर गेल्या 24 तासांत 933 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 88 हजार 612 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत 14 लाख 27 हजार 6 रुग्णांवर कोरोनावर मात केली आहे. सहा लाख 19 हजार 98 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 42 हजार 518 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी देशात 5 लाख 98 हजार 778 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सात ऑगस्टपर्यंत देशात 2 कोटी 33 लाख 87 हजार 171 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, रुग्ण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र अजुनही प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4,90,262 रुग्ण असुन मृतांची एकूण संख्या 17,092 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 1,45,582 रुग्णांवर उपचार सुरु असून 3,27,281 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये देशात 3 लाख 28 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. भारतात 2, 3, 5 आणि 6 ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.