India Corona Update: Good News! 20,917 रुग्णांनी केली कोरोनावर मात, कोरोनामुक्तांचे प्रमाण झाले 31.15 टक्के

India Corona Update: Good News! 20,917 patients overcome corona, corona-free rate 31.15 per cent

एमपीसी न्यूज – देशात आज (सोमवार) एका दिवसांत 1,559 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत देशातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 20 हजार 917 झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाण आता 31.15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

भारतात आतापर्यंत एकूण 16 लाख 73 हजार 688 कोरोना निदान चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 67 हजार 152 चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली असतानाच कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, ही आशादायक बाब मानली जात आहे.

एका दिवसांत 4,213 नवे कोरोनाबाधित रुग्ण

भारतात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत  एकूण 4213 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 67 हजार 152 पर्यंत वाढली आहे.

भारतात कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत 97 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशातील कोरोनाबळींचा आकडा 2,206 झाला आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 3.28 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात भारताला यश आले आहे. तो जागतिक मृत्यूदराच्या निम्म्याहून कमी आहे, ही भारताच्या दृष्टीने फार मोठी जमेची बाजू समजली जात आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतून मृत आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वजा केली असता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या निघते. भारतात 67 हजार 152 जणांना कोरोनाची लागण झाली असली तरी प्रत्यक्षात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 44 हजार 029 इतकी आहे. कालपासून आज सकाळपर्यंत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 2 हजार 557 ची भर पडली आहे.

देशातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढली असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात सामूहिक संसर्गाची परिस्थिती नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.