India Corona Update: खूशखबर! पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

India Corona Update: Good news! More cured than active corona patients for the first time in india महाराष्ट्र देशातील सर्वांत प्रभावित राज्य आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या 90 हजार पार गेलेली आहे.

एमपीसी न्यूज- भारतात कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान एक खूशखबर समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 चे एकूण 1,33,632 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1,35,206 जण यातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 2.76 लाखांहून अधिक झाली आहे.

कोविड-19 मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 7,745 पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्र देशातील सर्वांत प्रभावित राज्य आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या 90 हजार पार गेलेली आहे. राज्यात आतापर्यंत 3289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रासह देशातील इतर पाच राज्यांतही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारापेक्षा जास्त आहे. तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 34014 प्रकरणे समोर आली आहे. तिथे आतापर्यंत 307 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर क्रमांक येतो तो दिल्लीचा. तिथे 31309 रुग्ण सापडले आहे. तिथेही 905 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तिथे 18.5 हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.

गुजरातमध्ये 21 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तिथे आतापर्यंत 1313 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 11335 प्रकरणे आणि 301 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर राजस्थानचा क्रमांक लागतो. तिथे 11245 रुग्ण सापडले आहेत. राजस्थानमध्ये 255 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.