India Corona Update : 24 तासांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ 38,903 नवे रुग्ण, 543 रुग्णांचा मृत्यू

India Corona Update: In last 24 hours 'record break' 38,903 new patients, 543 patients died एकूण 10.77 लाखांपैकी 6.77 लाख रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65 टक्क्यांपेक्षा अधिक

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 देशात रेकॉर्ड ब्रेक’ 38 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 543 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 618 इतकी झाली आहे. देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 23 हजार 672 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे.

देशात आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात 18 जुलैपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर 1,37,91,839 नमूण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील 3,58,127 नमूने काल तपासण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे. जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10 वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी 8,348 नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.