India Corona Update : गेल्या 24 तासांत 54,366 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या घटली 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 54 हजार 366 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढीचा वेग मंदावत चालला आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती सात लाखांच्या आत आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांतील वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 77 लाख 61 हजार 312 एवढी झाली आहे. त्यापैकी 69 लाख 48 हजार 497 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांच्या खाली आली असून सध्या 6 लाख 95 हजार 509 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 690 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत आत्तापर्यंत देशात

1 लाख 17 हजार 306 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर

1.51 टक्के एवढा आहे. देशात गेल्या 24 तासांत 73 हजार 979 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.52 टक्के एवढं झाले आहे

देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. देशात 10 कोटी चाचण्यांचा टप्पा पार झाला आहे. मागील 24 तासांत विक्रमी 14 लाख 42 हजार 722 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासह देशातील आजवर करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या 10 कोटी 01 लाख 13 हजार 085 एवढी झाली आहे. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली .

वाढलेल्या चाचण्यांचे प्रमाण आणि त्यातुलनेत कमी झालेल्या रुग्णांची संख्या हि दिलासादायक बाब आहे. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक असून देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.