India Corona Update : गेल्या 24 तासांत 58,323 जण झाले बरे, कोरोनामुक्तांची संख्या 76 लाखांवर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 58 हजार 323 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह देशातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 76 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.96 टक्क्यांवर पोहोचले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 38 हजार 310 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 82 लाख 67 हजार 623 एवढी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे एकुण रुग्णांपैकी 76 लाख 03 हजार 121 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 91.96 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या साडे पाच लाखांच्या खाली आली असून, सध्या 5 लाख 41 हजार 405 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 23 हजार 097 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा आहे.

देशात आतापर्यंत 11 कोटी 17 लाख 89 हजार 350 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी सोमवारी (दि.2) 10 लाख 46 हजार 247 नमूणे तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. देशात दररोज होणा-या चाचणीच्या प्रमाणात आढळणा-या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 58 हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर, त्याप्रमाणात वाढलेल्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या आत आली आहे. देशासाठी हि दिलासादायक बाब मानली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.