India Corona Update: जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानावर, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 7466 नवीन रुग्ण

India Corona Update: India ranks ninth in the world with the highest number of 7466 new patients in the last 24 hours

एमपीसी न्यूज –  देशात गेल्या 24 तासांत  7466 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात वाढलेली आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याच बरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून भारताने टर्कीला मागे टाकत जागतिक क्रमवारीत नववे स्थान मिळविले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 175 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूंच्या बाबतीत भाराताने चीनलाही मागे टाकले आहे. आतापर्यंत 4706 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक 1982 मृत्यू महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये 960, तामिळनाडूत 145, तेलंगणा 67, आंध्र प्रदेशमध्ये 59, कर्नाटकात 47, पंजाब 40, जम्मू कश्मीर 27, हरयाणा 19, बिहार मध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

देशात एकूण करोना रुग्णांची संख्या  1,65,799 झाली आहे यापैकी  71,105 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 79,987 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरातून गावाकडे स्थलांतर केलेल्या नागरिकांमुळे आता कोरोनाने ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे.

देशात लागू करण्यात आलेल्या चौथ्या लाॅकडाऊनचा कालावधी येत्या 31 मे रोजी संपत असून देशातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन 5.0 बाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.