India Corona Update: वाढता वाढता वाढे! सलग सहाव्या दिवशी 9 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

India Corona Update: India's Single-Day Coronavirus Count Continues To Rise, 9,983 In 24 Hours मागील २४ तासांत देशात तब्बल 9983 रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येते.

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथिल करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु, त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 9983 रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येते. सलग सहाव्या दिवशी 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2.56 लाखांच्या वर गेला आहे. त्याचबरोबर भारत कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशात 7135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2,56,611 झाला आहे. यातील 1,241,095 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मागील 24 तासांत 206 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.


देशात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 48.35 टक्के आहे. वाढीचा दर हा 3.89 टक्के इतका आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नागरिकांना मुभा देण्यास सुरुवात केली आहे. याला ‘अनलॉक-1’ असे नाव देण्यात आले आहे. आजपासून (दि.8) देशातील काही ठिकाणी धार्मिक स्थळे, मॉल्स आणि रेस्तराँ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.