India Corona Update : गेल्या 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात 9 हजार 121 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून, 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 25 हजार 710 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 कोटी 06 लाख 33 हजार 025 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 36 हजार 872 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 73 लाख 32 हजार 298 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 15 हजार 664 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.15) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 81 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 813 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.42 टक्के एवढा आहे‌. देशात आतापर्यंत 87 लाख 20 हजार 2822 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.