India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्ण वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात दहा हजारांहून कमी म्हणजे 9 हजार 110 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून, 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 43 हजार 625 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 47 हजार 304 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 48 हजार 521 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 016 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 25 लाख 87 हजार 752 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 87 हजार 168 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.8) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 158 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97.24 टक्के एवढा झाला आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 62 लाख 59 हजार 008 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.