India Corona Update: गेल्या 24 तासांत सर्वाधिक 2003 रुग्णांचा मृत्यू; बरे होण्याचे प्रमाण 52.46 टक्क्यांवर

India Corona Update: Most 2003 deaths in last 24 hours; recovery rate at 52.46 percent आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील दिवसातील प्रामुख्याने दिल्ली आणि महाराष्ट्र येथील मृत्यू संख्या अद्यावत केल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे.

एमपीसी न्यूज- मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 रुग्ण वाढले असून, 2003 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या 3,54,065 वर पोहचली आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील मागील दिवसांची मृतांची संख्या यात समाविष्ट केल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे दिसून आल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून म्हटले आहे.

देशातील एकूण 3,54,065 करोनाबाधित रुग्णांपैकी सध्या 1,55,227 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1,86,935 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात 11,903 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.46 टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात प्रतिदिन नमुना चाचण्यांची क्षमता 3 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळेप्रमाणे अधिकाधिक खासगी प्रयोगशाळांना सहभागी करून घेण्याचे धोरण केंद्राने अवलंबले आहे. आत्तापर्यंत प्रतिदिन दीड लाखांपर्यंत नमुना चाचण्या केल्या जात होत्या.

खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी कमी किमतीत नमुना चाचण्या करण्याचेही आवाहन केले आहे.

काल देशातील बहुतांश राज्यांचा कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रसहित सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.