India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 329 जण कोरोनामुळे दगावले आहेत. दुसरीकडे गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 436 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 24 तासांत मृत झालेल्या तसेच, बरे झालेल्या रुग्णांची ही आजवरची सर्वात मोठी आकडेवारी आहे.

देशात नव्यांने वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 63 हजार 533 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 15 लाख 96 हजार 512 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. देशात सध्या 33 लाख 53 हजार 765 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 78 हजार 719 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.10 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 85.60 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 31 कोटी 82 लाख 92 हजार 881 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 69 हजार 223 चाचण्या सोमवारी (दि.17) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 44 लाख 53 हजार 149 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.