India Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे, चोवीस तासांत 2,59,170 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 59 हजार 170 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, ती वीस लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 53 लाख 21 हजार 089 एवढी झाली आहे. त्यांपैकी 1 कोटी 31 लाख 08 हजार 582 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 54 हजार 761 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 20 लाख 31 हजार 977 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 24 तासांत 1 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 80 हजार 530 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.18 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 86 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 26 कोटी 94 लाख 14 हजार 035 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 19 हजार 486 चाचण्या सोमवारी (दि.19) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.