India Corona Update : देशातील बाधितांची संख्या 70 लाखांच्या पुढे, 60 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – देशातील कोरोनाबाधितांची संख्या 70 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 74 हजार 383 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मागील 24 तासांत झालेल्या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 70 लाख 53 हजार 807 एवढी झाली आहे. सध्या देशात 8 लाख 67 हजार 496 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 60 लाख 77 हजार 977 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 918 रुग्ण दगावले आहेत. आत्तापर्यंत देशात 1 लाख 08 हजार 334 रुग्ण दगावले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देशात 1.53 टक्के एवढं आहे. देशात गेल्या 24 तासांत 89 हजार 154 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 86.16 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 8 कोटी 68 लाख 77 हजार 242 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 78 हजार 544 नमूने शनिवारी (दि.10) तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या नऊ लाखांच्या खाली आली असून रिकव्हरी रेट देखील वाढला आहे‌ केंद्र शासनाच्या कंटेनमेंट झोन स्ट्रॅटेजीचा फायदा होत असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.