India Corona Update: देशातील कोरोना बाधितांची संख्या 19 लाखांच्या पुढे, 24 तासांत 52,509 नवे रुग्ण

India Corona Update: Number of corona cases in the country exceeds 19 lakh, 52,509 new patients in 24 hours देशाचा रिकवरी रेट 67.19 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर 2.09 टक्के आहे जो इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे.

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत 52 हजार 509 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19 लाख त्यांच्यापुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 51 हजार 806 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. देशात आजवर 12 लाख 82 हजार 215 रुग्ण बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 19,08,255 एवढी झाली असून त्यापैकी 12,82,216 रुग्ण बरे झाले आहेत.

देशात सध्या 5,86,244 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यासह देशांतील एकूण मृतांची संख्या 39,795 इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशातील रुग्ण वाढीचा वेग वाढला असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. देशाचा रिकवरी रेट 67.19 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर 2.09 टक्के आहे जो इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत 2,14,84,402 नमुने तपासण्यात आले आहेत त्यापैकी जवळपास 6,19,652 नमुन्यांची चाचणी ही मंगळवारी (दि.4) रोजी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने रिकव्हरी रेट सुधारत आहे.

दरम्यान, आजपासून अनलॉक 3 ला सुरुवात होत आहे. अनलॉक 3 अंतर्गत नियमांत शिथिलता आणत अनेक सोयी-सुविधा सुरु करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.